Yedeshwari Devi Dharashiv | येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला भाविकांची गर्दी Special Report
तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रा उत्सवाला मोठ्या जल्लोषात सुरूवात झालीय. या यात्रोत्सवासाठी येरमाळा नगरीत भाविकांनी तुडुंब गर्दी केलीय. या यात्रोत्सवातून हा स्पेशल रिपोर्ट
धाराशिवच्या येरमाळात येडेश्वरी देवीचा उत्सव येरमाळा नगरीत भक्तीचा सागर येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेला भाविकांची मोठी गर्दी तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून येडेश्वरी देवीची ओळख चुनखडी वेचण्याची परंपरा आजही कायम पाच दिवस आमराईत देवीचा मुक्काम देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
येडेश्वरी देवी... आई तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि मराठवाड्याकतील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या या देवीच्या उत्सवाचा हा क्षण.... यानिमित्तानं धाराशिवची येरमाळा नगरी सध्या भाविकांनी फुलून गेलीये....
चैत्र पौर्णिमेपासून येडेश्वरी देवीची यात्रा सुरु होते... यात्रेदरम्यान पाच दिवस देवीचा मुक्काम असतो तो इथल्या आमराईत... मुख्य मंदिरातून येडेश्वरी देवीची पालखी आठवडी बाजारमार्गे आमराईत पोहोचते...